
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या सन २०२५-२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत आरोस येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने आपले वर्चस्व कायम राखत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल ९२.३% लागला असून, विद्यार्थिनींनी गुणवत्तेत बाजी मारली आहे.
या परीक्षेत अनुश्री आल्हाद नाईक हिने ८०.५०% गुणांसह महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. रेश्मा कृष्णा लमाणी ७२.६७% गुणांसह द्वितीय, तर श्रेया रामदास नाईक, ७१% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. महाविद्यालयातील एकूण १३ विद्यार्थ्यांपैकी १२ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. इंग्रजी, मराठी, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य आणि वर्ग शिक्षिका सुषमा प्रवीण मांजरेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.










