तिकीट न काढता प्रवास करताय..?

कोकण रेल्वे मार्गावर तिकीट तपासणीची विशेष मोहीम
Edited by:
Published on: November 24, 2023 18:17 PM
views 1374  views

मुंबई : कोकण रेल्वे आपल्या मार्गावर धावणाऱ्या  गाड्यांमधील तिकीट तपासणी पुढील तीन महिन्यासाठी अधिक तीव्र करणार आहे.अभिमानाने प्रवास करा,सन्मानाने प्रवास करा,तिकीट खरेदी करा आणि अभिमानाने प्रवास करा असा आवाहन कोकण रेल्वे ने केले आहे.

कोकण रेल्वे च्या मार्गावर धावणाऱ्या सर्व ट्रेन्स मध्ये सातत्याने तिकीट तपासणी करून विना तिकीट प्रवास करणाऱ्या अनधिकृत प्रवाशांवर कारवाई केली जात असते.ऑगस्ट ते ऑक्टोबर या गेल्या तीन महिन्यात करण्यात आलेल्या तिकीट तपासणीत14,150 विनातिकीट प्रवासी आढळून आले.त्यांच्या कडून86लाख 67हजार 820रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ऑगस्ट 2023मध्ये 4484 विनातिकीट प्रवाशांकडून26लाख67हजार555 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सप्टेंबर 2023मध्ये 4888 विनातिकीट प्रवाशांकडून27लाख09हजार700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तर ऑक्टोबर 2023मध्ये 4778 विनातिकीट प्रवाशांकडून32लाख60हजार565रुपयांचादंड वसूल करण्यात आला.

यापुढे ही तिकीट तपासणी ची मोहीम कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर सुरू रहाणार आहे. प्रवाश्यानी योग्य व वैध तिकीटासह प्रवास करावा असे आवाहन कोकण रेल्वे चे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी  केले आहे.