
दोडामार्ग : भारतीय लोकशाहीला दिशा देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्र सेवा दल, सिंधुदुर्ग यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १४ एप्रिलला सकाळी १०.०० वाजता गोपुरी आश्रम, ता. कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी दिलेल्या विचारांचे आजच्या समाजाला विशेष महत्त्व आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करताना समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधाननिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांची जाणीव निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरवादी, समाजवादी, संविधानवादी, लोकशाहीवादी व विज्ञाननिष्ठ विचारांचे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्र सेवा दल, सिंधुदुर्गचे संयोजक नितीन (बाळू) मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, अध्यक्ष म्हणून गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष गोविंद मुनकर उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण फडके,सुभाष ठाकूर देसाई, संजय वेतुरकर, विवेक सावंत (संविधानवादी), राष्ट्र सेवा दल, सिंधुदूर्गचे संबंधीत विनायक (बाळू) मेस्त्री - व्यवस्थापक, गोपुरी आश्रम वागदे कणकवली, डॉ. राजेंद्र मुंबरकर अध्यक्ष गोपुरी आश्रम, कलमताई परुळेकर- ज्येष्ठ सेवा दल साथी, नितीन वाळके संघटक (मालवण), मा. सुहास ठाकुर देसाई , संजय वेतुरेकर (कुडाळ), विजयालक्ष्मी चिंडक, श्रीम. मुर्ती कासार (सावंतवाडी), सहदेव पाटकर, अॅङ प्रविण नाईक अध्यक्ष राष्ट्र सेवा दल, सिंधुदूर्ग, डॉ. सुभाष सावंत सचिव राष्ट्र सेवा दल सिंधुदूर्ग, भाई परमेकर, सुचन कोरगांवकर, प्रा. प्रज्ञाकुमार गाथाडे यांच्याकडून या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.












