मंत्री आशिष शेलारांनी केली भगवंत गडाची पाहणी

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: April 11, 2026 19:56 PM
views 31  views

मालवण : राज्याचे माहिती आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज मालवण चिंदर येथील भगवंत गडावर जाऊन दर्शन घेत गडाची पाहणी केली. यावेळी पुरातत्व विभाग रत्नागिरीचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाने यांना भगवंत गडाचे डिजिटल सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. 


यावेळी भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, पंचायत समिती सदस्य व गट नेते दीपक सुर्वे, मंदिर मानकरी रविंद्र गोसावी, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गावकर, विकास संस्था चिंदर चेअरमन देवेंद्र हडकर, भाजपा सरचिटणीस महेश मांजरेकर, महिला आघाडी मोर्चा समृद्धी आसोलकर, माजी सभापती हिमाली अमरे, माजी उपसभापती राजू परुळेकर, शक्ती केंद्र प्रमुख बंडू गावडे, हडी ग्रामपंचायत सरपंच प्रकाश तोंडवळकर, संचालक पतसंस्था प्रकाश मेस्त्री, अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.