डॉ. आर एस कुलकर्णी यांचा खास सन्मान...!

Edited by: देवयानी वरसकर
Published on: July 12, 2023 20:36 PM
views 75  views

कोल्हापूर :  कोल्हापूर येथे ऑर्थोपेडिक कॉन्फरन्स KOACON - २०२३ अंडर द एजीज ऑफ महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन पार पडले. यामध्ये प्रो. डॉ. सी. डी. नल्लुलवर ओरेशन २०२३ साठी डॉ. आर एस कुलकर्णी यांची निवड झाली.  यामध्ये डॉ. आर. एस. कुलकर्णी यांनी अलनॉर स्टायलाईड फ्रॅक्चर इन डिस्टल रेडियस फ्रॅक्चर वर केलेल्या प्रदीर्घकाळ संशोधनावर प्रेझेंटेशन केले.

या ओरेशन लेक्चर मध्ये डॉ. आर एस कुलकर्णी यांनी आत्तापर्यंत नॅशनल आणि इंटरनॅशनल ऑर्थोपेडिक जर्नल मध्ये मागील ३२ वर्षात प्रसिद्ध केलेल्या निदान व उपचार पद्धतीवर विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच सदर यु.एस.एफ. व डी.आर.एफ. वर नाविन्यपूर्ण सर्जिकल इंटरव्हेन्शन व प्लास्टर टेक्निक वर गाईडलाईन दिले तसेच डी.आर.एफ. सर्जिकल ट्रीटमेंट मध्ये निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय यावर विस्तृत प्रेझेंटेशन केले. 

डॉ. आर. एस. कुलकर्णी यांचे डी.आर.एफ. वर २२ पब्लिकेशन रिजनल, नॅशनल आणि इंटरनॅशनल ऑर्थोपेडिक जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मुद्यांवर सखोल चर्चा करण्यात आली असून याच विषयावर रिजनल ऑर्थोपेडिक कॉन्फरन्स मध्ये चार वेळा, महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन कॉन्फरन्स मध्ये अकरा, कर्नाटक ऑर्थोपेडिक कॉन्फरन्स मध्ये सहा, इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन कॉन्फरन्स मध्ये सात आणि इंटरनॅशनल ऑर्थोपेडिक कॉन्फरन्स मध्ये तीन वेळा पेपर सबमिशन करून प्रेझेंटेशन केले. रीसेंट्ली सदर यु.एस.एफ. डी.आर.एफ. वर सखोल व प्रदीर्घ संशोधनासाठी इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन कडून डिसेंबर २०२२ मध्ये मोस्ट प्रेस्टीजियस के. टी. ढोलकीया गोल्डमेडल अवॉर्ड डॉ आर. एस. कुलकर्णी याना मिळाला.  

कोल्हापूर ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष प्रो. डॉ. सुनील ससे व सेक्रेटरी डॉ. राजीव ने. गांधी यांनी डॉ. आर एस कुलकर्णी यांना प्रो. डॉ. सी. डी. नल्लुलवर ओरेशन मेडल व सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.