
सावंतवाडी : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा यांच्यावतीने महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होत. दुपारपर्यंत ५० हून अधिक दात्यांनी रक्तदान करत पवित्र दान केलं. या निमित्ताने युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांचा सन्मान करण्यात आला.सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
'बांद्याचा बाप्पा' या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर बांदा यांच्यावतीने आज महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाने या आधी सलग चार वर्षे उत्स्फुर्त सहभागाने रक्तदान शिबिर यशस्वी केले असून यंदाचे आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे.
दरवर्षी मंडळाचे सर्व कार्यकर्ते, व्यापारी ग्रामस्थ,महिला शेकडोच्या संख्येने या शिबिरात सहभागी होतात. दुपारपर्यंत ५० हून अधिक दात्यांनी रक्तदान शिबीरात सहभाग घेत रक्तदान केले होते. उत्स्फूर्त असा प्रतिसाद या शिबीराला मिळाला. यानिमित्ताने युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विविध सामाजिक संघटना, रक्तदात्यांचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनय स्वार,उपाध्यक्ष आबा धारगळकर, शिबीर प्रमुख अक्षय मयेकर, संजय पिळणकर, निलेश मोरजकर, प्रथमेश प्रभू आदी उपस्थित होते.