“मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियान" योजनेबाबत घोटगे येथे विशेष ग्रामसभा संपन्न

Edited by:
Published on: September 17, 2025 16:59 PM
views 115  views

कुडाळ : "मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियान" योजनेबाबत आज विशेष ग्रामसभा घोटगे ग्रामपंचायत सभागृह येथे पार पडली. या ग्रामसभेला १२९ ग्रामस्थ उपस्थित होते. या अभियान प्रक्रियेबाबत सरपंच चैताली चेतन ढवळ, ग्रामपंचायत अधिकारी गणेश भोगले, अभियान संपर्क अधिकारी  विश्वास पाटील, तलाठी मालंडकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच चैताली ढवळ या अभियानात सहभागी होऊन ते यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी घोटगे उपसरपंच विजय नाईक, ग्रामपंचायत सदस्य सचिन तेली, रमाकांत कोरगावकर, पंढरीनाथ गुरव, जयश्री मडवळ, अनुसया ढवळ, लतिका गुरव दिपाली सावंत उपस्थित होते. तसेच घोटगे गावचे माजी सरपंच तुकाराम शिंदे, घोटगे ग्रामस्थ, तंटामुक्ती अध्यक्ष डेविड नाजारेथ, घोटगे ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशासेविका, सीआरपी उर्मिला परब, बचतगट प्रतिनिधी व गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

सदर सभा १२९ नागरिकांच्या उपस्थितीमध्ये यशस्वीरित्या संपन्न झाली. याबाबत सरपंच चैताली यांनी ढवळ समाधान व्यक्त केले. सदर सभेचे महत्व ओळखून ग्रामस्थांनी विशेष उपस्थिती दर्शवल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच सर्वाना सदर अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.