'सोनुर्ली कोकणची पंढरी' बहारदार गीत भाविकांच्या भेटीला..!

▪️ मंगळवारी लोटांगणाची जत्रा
Edited by: विनायक गावस
Published on: November 25, 2023 13:35 PM
views 498  views

सावंतवाडी : दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्लीच्या श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव मंगळवारी होत आहे. लोटांगणाची जत्रा म्हणून हा जत्रोत्सव प्रसिद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर 'सोनुर्ली कोकणची पंढरी' हे बहारदार गीत प्रेरणा क्रिएशन्स घेऊन आलं आहे. गौरव महाराष्ट्राचा उपविजेता कोकणातील युवा गायक सागर मेस्त्री व गायिका ब्रह्मानंदा पाटणकर यांच्या सुरेल आवाजात हे गीत गायलं आहे.

लोटांगणाच्या या जत्रोत्सवा निमित्त प्रेरणा क्रिएशन्स गेली अनेक वर्षे नवनवीन बहारदार गीत भाविकांच्या भेटीला घेऊन येतं. यंदाही संदीप सीताराम दळवी यांची निर्मिती व प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता यांची संकल्पना असलेलं 'सोनुर्ली कोकणची पंढरी' हे बहारदार देवी माऊलीच्या भक्तांच्या भेटीला घेऊन आले आहेत. या बहारदार गीताला भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हे गीत प्रणय दिगंबर राऊत यांनी लिहीलं असून गायक सागर मेस्त्री व ब्रह्मानंदा पाटणकर यांनी हे गीत गायल आहे. संगीतकार म्हणून प्रतीक कदम सागर मेस्त्री यांनी तर ढोलकी/दिमडी प्रतीक बाईंग, कोरस नंदिता सुवर्णा, ईश्वरी पांचाळ,आदर्श कदम यांनी दिला आहे. रेकॉर्डिंग स्टुडिओ

कृपेश कोळी साऊंडसिंथ स्टुडिओ अर्नाळा, व्हिडीओ एडिटींग गौरेश पाटकर यांनी केल. निर्मिती सहाय्य देव इंद्रलोक फार्मिंग, सोनुर्ली, देवेंद्र जयवंत नाईक, अमोल आनंद नाईक,बाळकृष्ण सखाराम गांवकर,दयानंद ननी गांवकर, सागर सुभाष तेंडुलकर, संतोष गंगाराम ओटवणेकर, विनायक किशोर कुडतरकर, चिन्मयी कृष्णा गांवकर यांनी केल. तर भरत गावंकर, सचिन मिशाळ सोनुर्ली पंचक्रोशितील ग्रामस्थ व श्री देवी माऊली देवस्थान कमिटी सोनुर्लीच विशेष सहकार्य या गाणाच्या निर्मितीसाठी लाभलं.