
सावंतवाडी : शिमगोत्सवात कोकणातील रुढी, परंपरा, संस्कृती जपत चित्तथरारक अनुभव देणारा उत्सव म्हणजे "कुणकेरीचा हुडोत्सव..." या चित्तथरारक, अंगावर शहारे उत्सवाचं वर्णन गीताच्या माध्यमातून करण्यात आला आहे. हे गीत सध्या गाजत आहे. मिडिया पार्टनर कोकणसाद LIVE च्या माध्यमातून या गीताच अनावरण करण्यात आल. कोलगाव उपसरपंच दिनेश सारंग, कुणकेरी उपसरपंच सुनिल परब, मंगेश सावंत, कोकणसादचे कार्यकारी संपादक अर्जून धस्के आदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.या गीताची संकल्पनाश्री. गुरु परब यांचि आहे गीत लेखक आणि निर्मिती सहाय्य श्री संदीप सुद यांच तर संगीत कपिल कांबळी यांनी दिल आहे.गायक संदेश कुणकेरकर,सौ.कार्तिका कांबळी, कपिल कांबळे यांनी हे गीत गायलं आहे.रेकॉर्डिंग स्टूडीओ मिक्सिंग आणि मास्टरिंग कपिल कांबळे यांनी तर व्हिडीओ एडिटिंग प्रसाद कदम यांनी केलय.ड्रोन शुटींग SM Productions India यांच असून कुणकेरी गावातील ग्रामस्थ, माता रमाई नगर कुणकेरी,श्री देवी भावई देवस्थान कमिटी, कुणकेरी, श्री देव क्षेत्रपाल देवस्थान कमिटी, आंबेगाव,श्री देव कालेश्वर देवस्थान कमिटी, कोलगाव मिडिया पार्टनर कोकणसाद live यांच विशेष सहाय्य लाभल आहे. हे गीत सध्या गाजत आहे.