मुणगे तिठा इथं सोलर हायमास्ट टॉवरचे लोकार्पण !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 20, 2024 09:18 AM
views 76  views

देवगड : देवगड मुणगे येथील श्री देवी भगवती हायस्कुल तीठा नजीक सोलर हायमास्ट टॉवरचे उदघाटन आमदार नितेश राणे यांच्या स्थानिक विकास काम निधी मधून सुमारे पाच लाख रुपयांच्या निधीतून सदर काम पूर्ण झाले. या वेळी डॉक्टर के. एन. नायसे व सेवानिवृत्त पो. नि. चंद्रकांत रासम यांच्या हस्ते उदघाटन झाले.

हायमास्ट मंजुरी साठी तत्कालीन सरपंच साक्षी गुरव व भाजप नेते तथा मुणगे सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत यांनी आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते. तत्कालीन सरपंच साक्षी गुरव आणि भाजप नेते गोविंद सावंत यांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे आमदार नितेश राणे यांनी हायमास्ट टॉवर याची आवश्यकता समजून  मुणगे ग्रामस्थ यांची मागणी असल्याने तत्काळ सोलर हायमास्ट मंजूर करून ५ लाखांचा निधी देऊन ग्रामस्थांची गैरसोय दूर केल्या या बद्दल आमदार नितेश राणे यांचे येथील ग्रामस्थ गोविंद सावंत यांनी आभार मानले आहेत.

यावेळी सरपंच सौ अंजली सावंत, सदस्य संजय घाडी, सौ साक्षी गुरव, भाजप नेते गोविंद सावंत, मनोज सावंत, सुनील सावंत, नारायण सावंत, श्रीपाद बागवे, संतोष लबदे, अरविंद सावंत, निशांत रासम, कृष्णकांत गुरव, दादा वळंजू, अनिरुद्ध कारेकर, तारामती पुजारे, पल्लवी सावंत व  इतर ग्रामस्थ उपस्थित मोठ्या प्रमानावरती उपस्थित  होते.