
वैभववाडी : तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांनी उपोषण सुरू केले आहे. शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाची झालेली दुरावस्था तसेच रस्ते, गटार व एसटी वाहतुकीच्या फेऱ्या या विविध विषयासंदर्भात त्यांनी उपोषण छेडले आहे. जुन्या बस स्थानक परिसरात सकाळपासून ते उपोषणास बसले आहेत. तालुकावासीय प्रत्यक्ष भेटून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहेत.