सामाजिक बांधिलकीचे कार्य आदर्शवत! ; प्रेरणादायी युवा आरजे अनघा मोडक!

दिव्यांग भगिनीला व्हीलचेअर वाटप
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 12, 2023 16:01 PM
views 243  views


सावंतवाडी : सामाजिक बांधिलकीच्या विविध प्रकारच्या  सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य उपक्रमाबाबत मी खरोखरच भारावले असून हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी व आदर्शवत आहे, असे मत सुप्रसिद्ध युवा आरजे अनघा मोडक यांनी येथे व्यक्त केले. तसेच सामाजिक बांधिलकीच्या वाखण्याजोगे कार्याचे तोंड भरून कौतुक केले व सामाजिक बांधिलकीच्या या कार्याचा इतरही लोकांनी बोध घेऊन अशाच प्रकारे दीन - दुबळ्यांना मदत करावी, असे आवाहन करून सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांचे अनघा मोडक यांनी अभिनंदन केले.

बावळट येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते सुरेश कदम  यांनी बुधवार दिनांक ११ जानेवारी रोजी सामाजिक बांधीलकी संघटनेच्या रवी जाधव यांच्याशी संपर्क साधून सातोळी गावातील रहिवासी  इयत्ता आठवीमध्ये शिकणारी १४ वर्षीय पुण्याई कांबळे ही मुलगी दिव्यांग असून तिला शाळेत जाण्यासाठी व्हीलचेरची आवश्यकता आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आपल्या कारणाने ही गरज तिचे पालक पूर्ण करू शकत नाहीत. गेले कित्येक वर्ष त्यांची मुलगी या सोयी पासून वंचित असल्याने तिचे खूप हाल होत आहेत. तरी आपण आपल्या सामाजिक बांधिलकीकडून व्हीलचेअर साठी काही मदत कराल तर त्या कुटुंबावर आपले  फार उपकार होतील, अशी त्यांनी सामाजिक बांधिलकीला विनंती केली.

दरम्यान सदर विषयाचे गांभीर्य जाणून 'सामाजिक बांधिलकी'च्या माजी नगरसेविका कीर्ती बोंद्रे व त्यांचे पती किशोर बोंद्रे यांनी सदर मुलीला व्हीलचेअर मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन एक चांगल्या गुणवत्तेची अत्याआधुनिक व्हीलचेअर खरेदी करून  सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांजवळ दिली. यासाठी सालईवाडा येथील एस. के. सर्जिकल यांचेही सहकार्य लाभले.

गुरुवारी दिनांक १२ जानेवारी रोजी प्रेरणादायी युवा आरजे अनघा मोडक (मुंबई) यांच्या प्रमुख  उपस्थितीत तसेच माजी नगरसेविका कीर्ती बोंद्रे यांच्याहस्ते सदर दिव्यांग कन्या पुण्याई कांबळे या विद्यार्थिनीला अत्याधुनिक अशी व्हीलचेअर सुपूर्द करण्यात आली.

याप्रसंगी सामाजिक बांधिलकी संघटनेचे अनिल परुळेकर, संजय पेडणेकर, प्रा. सतीश बागवे, समीरा खलील, हेलन निब्रे, रूपाली मुद्राळे, कीर्ती बोंद्रे, प्रा. रुपेश पाटील, प्रा. सुभाष गोवेकर, ज्येष्ठ पत्रकार अॅड. संतोष सावंत, प्रवीण सूर्यवंशी, विद्धेश सावंत, साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रूपाली पाटील, न्हानू देसाई, साहस प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते सुरेश कदम आदी उपस्थित होते.