
सावंतवाडी : कोकणातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ सालईवाडा या मंडळाच यंदाच ११९ व वर्ष आहे. या निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव महिला समिती सालईवाडा तर्फे दिव्यांग मुलांसोबत एक दिवस घालविण्यात आला. या उपक्रमात सहभागी होऊन त्या मुलांना आर्थिक मदत, खाऊ वाटप केल.
या उपक्रमात मंडळाच्या महिला आनंदाने सहभागी झाल्या. मुलांच्या चेहऱ्यावरील समाधान शब्दांत व्यक्त करण्यापलिकडे होत असं मंडळाच्या महिला म्हणाल्या. यावेळी सायली बांदेकर, उमा चोडणकर, दिपाली नेवगी, शिला सावंत, शिवानी बांदेकर, रुपाली पाटील आदी उपस्थित होते.










