बंटी माठेकर मित्रमंडळाची सामाजिक बांधिलकी !

Edited by: विनायक गांवस
Published on: March 28, 2024 13:27 PM
views 140  views

सावंतवाडी : वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था बंटी माठेकर मित्रमंडळाच्या माध्यमातून करण्यात आली. डोंगराच्या पायथ्याशी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.                   

उन्हाळा सुरू झाला असून वन्य प्राणी पाण्याच्या शोधामध्ये भरवस्तीमध्ये येत असल्याने लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. याकरिता बंटी माठेकर मित्रमंडळाच्या माध्यमातून वन विभागाला वारंवार पत्र देऊन देखील वन विभागाने याची दखल घेतली नाही. अखेर वन्य प्राण्यांना पाणी मिळावं याकरिता मदारी रोड सासोलकर मैदान शेजारी या मित्र मंडळाने कृत्रिम पाण्याची तळी तयार केली आहे. याकरिता अमित सावंत, संजय नाईक, सचिन सासोलकर, बाळा सोनकर, बंटी माठेकर, प्रसाद जोशी व पाटकर यांनी यासाठी पुढाकार घेऊन वन्य प्राण्यांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था केली आहे.

अशाच प्रकारे वन विभागामार्फत देखील ठिकठिकाणी कृत्रिम पाण्याची तळी तयार करून वन्य प्राण्यांसाठी पाणी पाण्याची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे भर वस्तीमध्ये वन्य प्राणी येऊ नये याकरिता देखील वन विभागाकडून लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा अशी मागणी बंटी माठेकर मित्रमंडळाने केली आहे.