अजयकुमार सर्वगोड यांची सामाजिक बांधिलकी...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 23, 2024 07:29 AM
views 251  views

कणकवली : साने गुरुजी यांनी धर्माची व्याख्या बदलली. जगातील सर्वात मोठा कोमल हदयाचा महान लेखक अणि थोर समाजसुधारक म्हणजे साने गुरुजी हे होय. जग  म्हणजे नुसते मानव प्राण्यांनी भरलेले नसुन या जगामध्ये पशु ,पक्षी, प्राणी व निसर्गाचाही समावेश आहे. आता सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये जवळपास ४० अंश पेक्षा जास्त तापमानाचा पारा चढलेला आहे.

तसेच दुपारच्या वेळेस रस्त्यावर चिट पाखरु सुध्दा  दिसुन येत नाही.  प्रचंड तापमानामुळे  कावळे, चिमण्या, छोटे छोटे पशु या उन्हाच्या झळांमुळे पाणी अणि खाद्य मिळत नसल्यामुळे त्यांची संख्या रोडावत चालली आहे. यासाठी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी आपल्या घराकडे पाण्याची आणि धान्याची व्यवस्था केली आहे.

त्याचबरोबर  सा. बां. विभाग कणकवली येथील विश्राम गृहा जवळ राष्ट्रीय महामार्ग लगतच्या गटारात एका कुत्रीने चार पिलांना जन्म दिला आहे. त्यांना सुद्धा अजयकुमार सर्वगोड  रोज खाऊ देत आहेत. आपल्या कामाच्या व्यापातून अजयकुमार सर्वगोड यांची हि कृती नक्कीच कौतुकास्पद आहे.