
सावंतवाडी : आंबेडकर जयंती निमित्त गावागावातून हजारोंच्या संख्येने सावंतवाडी समाज मंदिर येथे आलेल्या व रखरखत्या उन्हामध्ये बसलेल्या आंबेडकरी अनुयायींना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान तर्फे दरवर्षीप्रमाणे दूध कोल्ड्रिंकचे वाटप करण्यात आले. यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची सचिव समीरा खलील, रवी जाधव, लक्ष्मण कदम, प्रा. सतीश बागवे, शरदनी बागवे यांनी पुढाकार घेतला.
तसेच राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिवाजी चौक येथील संध्याकाळच्या रॅलीतील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्यावतीने आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले. यासाठी राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर व रवी जाधव यांनी पुढाकार घेतला.