
सावंतवाडी : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मळेवाड - कोंडूरेच्या वतीने शिवजयंती निमित्ताने वन्यजीवांसाठी पाणवठ्याची साफसफाई कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीपुजनानंतर कोंडुरे येथील जंगलात जाऊन "वझर तळी" या पाणवठ्यावर परिसर स्वच्छता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला वनविभाग अधिकारी,ग्रामस्थ उपस्थित राहणार असून सर्वांनी या स्वच्छता कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मळेवाड कोंडूरे यांनी केले आहे.










