सावंतवाडी होणार शिवमय ; भव्य मोटरसायकल रॅली

विश्व हिंदू परिषद - बजरंग दल सावंतवाडीचं आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: February 18, 2026 20:57 PM
views 36  views

सावंतवाडी : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सावंतवाडी यांच्यावतीने यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरात विविध कार्यक्रमांची मांदियाळी असून संपूर्ण सावंतवाडी शिवमय होणार आहे. या सोहळ्याची सुरुवात सकाळी ८:०० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व मूर्तींच्या पूजनाने होईल. त्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत सकाळी १०:०० वाजता शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात येणार आहे.

या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सायंकाळी ४:०० वाजता निघणारी भव्य मोटरसायकल रॅली. ही रॅली कोकण कॉलनी काजरकोंड येथून सुरू होऊन बाहेरचावाडा मार्गे गांधी चौक येथे विसर्जित होईल. सायंकाळी ७:०० ते ८:०० या वेळेत उपस्थित शिवभक्तांना प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजन नितीन महाजन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. रात्री ८:०० ते १०:०० या वेळेत पारंपरिक वेशभूषा स्पर्धा पार पडणार असून, यामध्ये शिवकालीन संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. आजच्या डिजिटल युगाचा विचार करून आयोजकांनी तरुणाईसाठी विशेष 'रिल्स' स्पर्धेचे आयोजन केले आहे. १९ फेब्रुवारीच्या रॅली दरम्यान किमान ४५ सेकंदांची रिल शूट करून ती २१ फेब्रुवारीपर्यंत आपल्या Instagram पेजवर पोस्ट करायची आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी @gor_akshk या पेजला फॉलो आणि कोलॅब करणे बंधनकारक असून, रिलच्या कॅप्शनमध्ये नाव व फोन नंबर टाकणे आवश्यक आहे. या स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा २४ फेब्रुवारी रोजी रात्री ९:०० वाजता Instagram वर केली जाईल. प्रथम क्रमांकासाठी ३,००० रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी २,००० रुपये व सन्मानचिन्ह असे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचे मुख्य स्थळ गांधी चौक, सावंतवाडी हे असून, अधिक माहितीसाठी ९४०३८५१६३७ किंवा ९३५९९०७५३४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल सावंतवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.