
सावंतवाडी : नववर्षाच्या स्वागतासाठी सावंतवाडीतील लहान मुलांसाठी पर्वणी असणारे किड्स वर्ल्ड आणि बेबीस वर्ल्ड यंदा दिनदर्शिका घेऊन आल आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील राऊळ, किड्स वर्ल्डचे अभिषेक राऊळ यांच्या संकल्पनेतून हे कॅलेंडर तयार करण्यात आल असून लहान मुलांना आवडणाऱ्या विविध वस्तू या कॅलेंडरमध्ये पहायला मिळत आहेत. या दिनदर्शिकेचे प्रकाशन भाजप जिल्हा प्रवक्ते माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगांवकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी सह्याद्री फाउंडेशनचे अँड. संतोष सावंत, प्रल्हाद तावडे, प्रताप परब, सुहास सावंत, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.