
वैभववाडी : विद्यामंदिर आचिर्णे नंबर १ शाळेत वायफाय सुविधा आणि ध्वजस्तंभासाठी केलेल्या योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष बोडके यांचा नुकताच ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
श्री. बोडके यांनी शाळेसाठी वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली असून, ध्वजस्तंभही उभारून दिला आहे. या महत्त्वपूर्ण योगदानामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्यांच्या या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २४ सप्टेंबर २०२५ रोजी शाळेत खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात सरपंच वासुदेव रावराणे, तंटामुक्ती अध्यक्ष महेश रावराणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर गुरव, ग्रामसेवक काळे मॅडम, पोलीस पाटील नरेंद्र गुरव यांच्यासह रुपेश रावराणे, सुशीलकुमार रावराणे, आदेश रावराणे, गणेश रावराणे, मोहन रावराणे, आबू गुरव आणि सत्यवान जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. बोडके यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि पालकांनी श्री. बोडके यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांच्या योगदानाने शाळेच्या विकासाला चालना मिळाली असून, भविष्यातही त्यांच्याकडून असेच सहकार्य अपेक्षित असल्याचे अनेकांनी सांगितले.










