प्रसाद गावडेंचा "लेटर बॉम्ब" मधून गंभीर आरोप

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 04, 2025 22:17 PM
views 36  views

सिंधुदुर्गनगरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्गकडील कायम कर्मचारी "लेट लतीफ" बनून कार्यालयीन वेळेपेक्षा दैनंदिन एक ते दीड तास उशिराने हजर राहत असून दुपारी जेवणासाठी देखील दीड ते दोन तास गायब असतात. ही तक्रार ताजी असतानाच आता मेडिकल कॉलेज कार्यालयातील  वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांनी स्वतःसाठी वातानुकूलित यंत्र एसी बसवल्याचे पुढे आले असून गावडेंनी त्यास आक्षेप घेत सामान्य प्रशासन विभागाच्या वातानुकूलित यंत्र (एसी) बसवण्यासाठी मार्गदर्शक सूचनांची आठवण करून देत  वर्ग 3 चे कर्मचारी स्वतःसाठी दालनात एसी बसवून जनतेच्या पैशांवर मौजमजा करत असल्याचा आरोप केला आहे. याशिवाय गावडेंनी दिलेल्या पत्रात रुग्णालयात आहार सेवा पुरवणारे ठेकेदार रुग्णांना व स्तनदा मातांना आहारात दैनंदिन एक फळ देणे आवश्यक असताना सेवा पुरवठादार फळ देत नाही याची माहिती असून देखील त्याची पूर्ण देयके कोणत्या हितसंबंधांमधून मंजूर  होतात याकडे लक्ष वेधले आहे.तसेच रुग्णालयात वस्त्रधुलाई सेवा देणाऱ्या पुरवठादाराने बेडशीट, पिलो कव्हर, डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांचे गाऊन्स क्लोरीनने स्वच्छ करून इस्त्री करण्याचे करारात नमूद असताना देखील फक्त साध्या पाण्याने धुलाई करत विना ईस्त्री कपड्यांची सेवा देत असल्याबाबत चौकशी अहवालात निष्पन्न होऊन देखील सेवा पुरवठा दराचे कोणतीही वजावट न करता बिले मंजूर होतात यामागे कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी व ठेकेदार यांची भ्रष्ट युती कारणीभूत असल्याचा आरोप देखील गावडे यांनी पत्रात केला आहे. सर्वसामान्य रुग्णांची सीबीसी रक्त चाचणी करणारी मशीन चार साडेचार महिने बंद अवस्थेत राहते हा बेजबाबदारपणा नाही का असा सवालही त्यांनी पत्रातून केला आहे.