
दोडामार्ग : दोडामार्ग येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच निवृत्त शिक्षक गोपाळ भिकाजी गावडे वय वर्षे ७८ यांचे बुधवारी दुपारी निधन झाले. गोपाळ गावडे यांच्या पत्नी कै. उपमा गावडे, दोघे मिळून त्यांनी सामाजिक कार्ये सुरू केले होते. निराधाराचा आधार गोपाळ गावडे कुटुंब होते.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच दोडामार्ग तालुक्यातील अनेक ग्रामस्थ व्यापारी सामाजिक कार्यकर्ते शिक्षक वर्ग यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, विवाहित मुली असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश गावडे यांचे ते वडील होते.