सामाजिक कार्यकर्ते बाबाजी पवार यांचे निधन!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 22, 2022 20:39 PM
views 335  views

वैभववाडी : खांबाळे येथील सामाजिक कार्यकर्ते बाबाजी जयराम पवार वय-८५ यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्यावर खांबाळे येथे अत्यंसंस्कार करण्यात आले.यावेळी सामाजिक,सांस्कृतीक,राजकीय क्षेत्रातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते

श्री. पवार यांचा गावातील सामाजिक कार्यात मोठा वाटा होता.सामाजिक,सांस्कृतीक,कृषी,धार्मीक आदी क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले आहे.त्यांना आप्पा या टोपण नावाने ओळखले जायचे.त्यांच्या पश्यात एक मुलगा,एक मुलगी,पुतण्या,सुना,नातवंडे,जावई असा मोठा परिवार आहे.