
मालवण : कुडाळ येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत तसेच चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. अश्या वाचाळ वक्तव्य वीरांना लगाम घालणे आवश्यक असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ कडक कारवाई व्हावी. अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करून अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी जशास तसे उत्तर दिले जाईल. अशी आक्रमक भूमिका मालवण तालुका भाजपच्या वतीने मांडत मालवण पोलिसांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, अशोक तोडणकर, अजिंक्य पाताडे, प्रमोद करलकर, विजय ढोलम, ललित चव्हाण, सुनील बागवे, निकम यासह अन्य उपस्थित होते.