
सावंतवाडी : बाबुराव धुरींचे विधान योग्यच असून सासोलीच्या लोकांसह मी आहे. तसेच आकाश फिडमीलचा प्रश्नही सोडवला होता. पण अजूनही या कारखान्यामुळे ग्रामस्थांना त्रास होतोय. जर आठ दिवसात तो वास येण बंद झालं नाही तर फॅक्टरी बंद करणार असा इशारा मंत्री दीपक केसरकर यांनी दिला. स्थानिक २०० लोक कामाला असल्यानेच आपण कारखान्याला परवानगी दिल्याचेही ते म्हणाले. तर, झोपलेल्याला जाग करणं शक्य आहे, झोपेचं सोंग घेतलेल्यांना नाही असा टोला राजन तेली यांच नाव न घेता मंत्री केसरकर यांनी हाणला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, मी जनतेसोबत राहतो. जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत असतो. त्यामुळे आकाश फिडमीलने ताबडतोब हा वास पूर्णपणे बंद करावा. ही फॅक्टरी सुरु करायला परवानगी देण्याच कारण तिथे आमची स्थानिक मुलं काम करत आहेत असंही त्यांनी स्पष्ट केले. तर जागा वाटप सुरु झाल की आचारसंहितेच बंधन राहातं नाही. आंबोली, गेळे प्रमाणे चौकुळचा प्रश्न सुटला आहे. मतदारसंघातील सर्व प्रश्न मी सोडवले आहेत. त्यातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा एक प्रश्न राहीला आहे. हे हॉस्पिटल मी मंजूर करून आणलं आहे. जागेच्या संदर्भातील राजघराण्यातील एक केस मागे घेतल्यानंतर याच काम सुरु होणार आहे. तिलारी पुनर्वसनातील लोकांना त्यांचे हक्क प्राप्त करून दिले आहे. राहीलेल्या लोकांचेही प्रश्न मार्गी लागतील. सावंतवाडी बस स्थानकाच बीओटी तत्त्वावर काम होणार आहे. तिलारीत मोठा प्रोजेक्ट होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. चांगला प्रकल्प भव्य स्वरूपात तिथे होणार आहे. आडाळीत नवीन कंपनीन येण्याची इच्छा वर्तवली आहे. अडीचशे कोटींची गुंतवणूक करणारी कंपनी आहे. माझ्या हस्ते त्याचा शुभारंभ होणार असं उद्योगमंत्री यांनी तसं सांगितलं आहे. त्यामुळे ज्या लोकांचे पेपरात फोटो येतात त्यांनी सुद्धा या शुभारंभाला उपस्थित राहावे असा टोला राजन तेली यांच नाव न घेता दीपक केसरकर यांनी हाणला. झोपलेल्या जाग करणं शक्य आहे झोपेचं सोंग घेतलेल्यांना नाही असंही ते म्हणाले.
तर यापुढे महाराष्ट्राची नको तर मला कोकणाची जबाबदारी द्या असं मुख्यमंत्री यांना सांगितलं आहे. सर्वांगीण प्रगती होत असताना पुढच्या काळात कोकणासाठी काम करायचं आहे. मला मंत्रिपदाचा मोह नाही. पण, कोकण विभागाची जबाबदारी द्या असं मुख्यमंत्री महोदयांना सांगितले आहे.कोकणचा सर्वांगीण विकास हीच माझी भुमिका आहे असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.