जिल्ह्यात अतापार्यंत एवढ झालं मतदान..!

Edited by:
Published on: November 05, 2023 15:26 PM
views 169  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकांसह पोट निवडणूक आज होत आहेत, यासाठी सकाळपासून मतदान सुरू झाले आहे , सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी 1.30 वाजेपर्यंत 51.31% मतदान झाले आहे. तर पोटनिवडणुकीमध्ये  जिल्ह्यात 47.42% मतदान झाले आहे.

जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वेंगुरला तालुक्यात 53.46%, दोडामार्ग तालुक्यात 42.36%, कुडाळ तालुक्यात 54.39%, मालवण तालुक्यात 36.78%, कणकवली तालुक्यात 62.7%, देवगड तालुक्यात  57.17%  एवढे मतदान झाले आहे. असे मिळून 51.31% मतदान झाले आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंत पोट निवडणुकीत कुडाळ तालुक्यात 41.7%, मालवण तालुक्यात 41.78%, कणकवली तालुक्यात 58.4% मतदान झाले आहे. असे मिळून 47 पॉईंट 42 टक्के मतदान झाले आहे 

तर यामध्ये सर्वाधिक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मालवण तालुक्यात सर्वात कमी मतदान आतापर्यंत झाल्याचे समोर आले आहे, देवगड तालुक्यात झाले आहे, तर पोट निवडणुकीमध्ये कणकवली तालुक्यात सर्वाधिक मतदान झाले आहे.