कुडाळमध्ये आत्तापर्यंत एवढं झालं मतदान..!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 05, 2023 12:30 PM
views 83  views

कुडाळ : तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकीच्या पाच ग्रामपंचायतीमध्ये 37% मतदान  झाले आहे. तर पोट निवडणुकीच्या गावराई आणि तेंडोली ग्रामपंचायत सदस्य पदासाठी आतापर्यंत ( सकाळी 11.30) 33 टक्के मतदान झाले आहे.

वालावल हूमरमळा, वालावल ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने या दोन्ही ग्रामपंचायती माझी जि प सदस्य रणजीत देसाई यांच्यासाठी ते या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये तळ ठोकून बसले आहेत, तर या दोन्ही ग्रामपंचायती  उबाठा गटाचे अतुल बंगे यांच्यासाठी सुद्धा प्रतिष्ठेच्या आहेत.

तर अनाव हूमरमळा ही ग्रामपंचायत कुडाळ पंचायत समिती माजी उपसभापती जय भारत पालव यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. तर माजी खासदार निलेश राणे यांचे खाजगी स्वीय सहाय्यक योगेश घाडी यांच्या साठी भडगाव ग्रामपंचायत महत्त्वाची आहे मात्र या ठिकाणी आमदार वैभव नाईक या ठिकाणी तळ ठोकून बसले आहेत.

तर वर्दे ग्रामपंचायत उबाठा गटाचे जि प सदस्य नागेंद्र परब यांच्यासाठी महत्त्वाची आहे तर भाजप ओरोस मंडळ तालुकाध्यक्ष दादा साईल यांच्यासाठी ही महत्त्वाची आहे. मात्र या सर्व निवडणुकांमध्ये नक्की कोण बाजी मारणार हे उद्या सकाळी स्पष्ट होणार आहे.