स्नेहल सावंत यांना राष्ट्रीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान !

Edited by: संदीप देसाई
Published on: September 21, 2023 12:30 PM
views 81  views

दोडामार्ग :  कोल्हापूर येथील अविष्कार फाउंडेशन ऑफ इंडिया या सेवाभावी संस्थेच्यावतीने गुणवंत शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिंना जाहीर झालेला पुरस्कार वितरण सोहळा नुकताच रविवारी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड - रायगड येथे आमदार भरतशेठ गोगावले व हिरवळ  एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष किशोर धारीया व संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत  संपन्न झाला. यावेळी दोडामार्ग तालुक्यातील सौ. स्नेहल सदानंद सावंत यांना राष्ट्रीय गुणवंत शिक्षिका म्हणून सन्मानीत करण्यात आले. 

कोनाळकट्टा नं.१ या शाळेत मुख्याध्यापिका या पदावर काम करत आहेत. त्यांनी केलेल्या ३४ वर्षाच्या शैक्षणिक कारकिर्दीची दखल घेऊन त्यांचा अविष्कार फाउंडेशन च्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी त्यांचे पती सदानंद सावंत यांच्या सह पुरस्कार स्विकारला. यावेळी अविष्कार फाउंडेशन चे अध्यक्ष संजय पवार, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष  राजेश सुर्वे, कोकण विभागीय अध्यक्ष संदीप नागे, रायगड जिल्हाध्यक्ष शंकर शिदे आदी मान्यवर उपस्थित होते.