
कणकवली : 'कणकवली शिक्षण संस्था कणकवलीच्या' एस. एम. हायस्कूल कणकवली मधील कुमारी डेलीशा संदीप सावंत (इयत्ता सहावी अ ) हीने एस. टी. एस. परीक्षेत जिल्ह्यामध्ये चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. तिला प्रशालेतील एस. सी. मयेकर, एन. एन. तायशेटे, एस. एम. पवार, एस. एम. नौकुडकर या शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.
तिच्या या उत्तुंग यशाबद्दल कणकवली शिक्षण संस्था कणकवलीच्या अध्यक्षा डॉक्टर धनश्री संदीप सावंत, चेअरमन डॉक्टर संदीप सावंत, सचिव डी. एम. नलावडे, उपकार्याध्यक्ष डॉक्टर सूर्यकांत तायशेटे, उपकार्याध्यक्ष एम. ए. काणेकर, मुख्याध्यापक जी. एन. बोडके व प्रशालेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले आहे. डेलीशा ही आबू तायशेटे मेमोरियल हॉस्पिटल कणकवलीच्या डॉक्टर धनश्री सावंत व डॉक्टर संदीप सावंत यांची सुकन्या असून डॉक्टर सूर्यकांत तायशेटे व सौ. शुभांगी तायशेटे (आहारतज्ञा ) यांची नात आहे.