
कणकवली : पावसाळा सुरू झाल्याने कलमठ गावामध्ये डासांची पैदास वाढली आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. डासांमुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे डासांच्या नियंत्रणासाठी ग्रा.पं. प्रशासनाने गावात धूर फवारणी करावी, अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाच्या युवासेनेचे कलमठ शहरप्रमुख तथा ग्रा.पं.सदस्य धीरज मेस्त्री यांनी ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदत म्हटले आहे की, कलमठ गावात डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे गावात डेंग्यू, मलेरिया यांसारखे साथीचे आजार पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे गावात डासांच्या नियंत्रणासाठी तातडीने फाॅगिंगमशीनद्वारे धूर फवारणी करणे गरजेचे आहे. कलमठ ग्रामपंचायतीने नागरिकांच्या आरोग्यादृष्टीने गावात लवकरात लवकर डासांची नियंत्रणासाठी धूर फवारणी करून डासांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.