
दोडामार्ग : दोडामार्ग येथील वृत्तपत्र विक्रेते सुमन मणेरीकर यांच्या मातोश्री स्मिता सुधाकर मणेरीकर वय वर्षे ८९ यांचे अल्पशा आजाराने शनिवारी राहात्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने वृत्त कळताच व्यापारी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईक यांनी निवासस्थानी भेट देऊन अंत्यदर्शन घेतले. काही व्यापाऱ्यांनी दुकानेही बंद ठेवली.