गणेशभक्त स्लीपर एसटीच्या प्रतीक्षेत !

कुडाळ, कणकवली, वैभववाडी तालुक्यांना नाहीय रूट
Edited by: उमेश बुचडे
Published on: September 23, 2023 13:04 PM
views 121  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणेश चतुर्थीच्या आधी  एसटीच्या स्लीपर गाड्या दाखल होणार असल्याचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी सांगितले. गाड्या दाखलही झाल्या. पण, अजूनपर्यंत या गाड्यांचे रूट कुडाळ, कणकवली, वैभववाडी या तालुक्यांमध्ये लागले नसल्याने मुंबईला जाणाऱ्या गणेशभक्तांना एसटी स्लीपरची प्रतीक्षा करावी लागणार असे दिसत आहे.

चतुर्थीच्या कालावधीत मोफत रेल्वे प्रवास तसेच एसटी प्रवास देणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी जर या एसटीच्या स्लीपर बसेस सुरू करण्यासाठी नियोजन केले असते तर आता परतीच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांचे हाल झाले नसते. तसेच खाजगी बसचे दर देखील आता 1500 ते 3000 रुपये पर्यंत पोहोचले आहेत. ऑनलाईन हे दर दिसतात आणि प्रवासी तिकीट देखील खरेदी करत असल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आरटीओ विभागाच्यावतीने ज्यादा दर आकारल्यास आपल्यालात्या खाजगी बस गाडीचा नंबर व तिकिटाचा फोटो या व्हाट्सअप नंबरवर  9822842333 पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.