
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा सकल हिंदू समाजाच्या जिल्हा अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांची निवड सकल हिंदू समाजाचे राज्य समन्वयक श्रीपाद अभ्यंकर यांनी केली आहे. याबाबतचे पत्र श्रीपाद अभ्यंकर यांनी सिताराम गावडे यांना पाठविले आहे.
सिताराम गावडे हे गेली ३५ वर्षे विविध सामाजिक क्षेत्रातील संघटनांवर कार्यरत असून हिंदू समाजासाठी देत असलेल्या त्यांच्या योगदानाची दखल घेऊन ही निवड केल्याचे राज्य समन्वयक श्रीपाद अभ्यंकर यांनी या पत्रात म्हटले आहे. सिताराम गावडे यांनी आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष, विशेष कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग, भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य, सकल मराठा समाज सावंतवाडी तालुका अध्यक्ष, बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळ संस्थापक अध्यक्ष अशी अनेक पदे भूषवून त्या पदांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या निवडीसाठी सकल हिंदू समाजाकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.