नाट्यगीत गायन स्पर्धेत सावंतवाडीची समृद्धी सावंत प्रथम

निधी जोशी द्वितीय तर केतकी सावंत तृतीय
Edited by: विनायक गांवस
Published on: April 26, 2023 17:45 PM
views 115  views

सावंतवाडी : श्री देव वेतोबा देवस्थान व पं. लालजी देसाई संगीत विद्यालय, आरवली आयोजित 'भव्य नाट्यगीत गायन स्पर्धा २०२३' मध्ये सावंतवाडीच्या समृद्धी सावंत हीन प्रथम क्रमांक प्राप्त केला.या स्पर्धेत एकापेक्षा एक सरस अशी नाट्यगीत सादर करण्यात आली.

श्री देव वेतोबा देवस्थान व पं. लालजी देसाई संगीत विद्यालय, आरवलीन या भव्य स्पर्धेच आयोजन केले होते. यात सावंतवाडीची समृद्धी सावंत प्रथम, द्वितीय निधी जोशी, तृतीय क्रमांकांची मानकरी केतकी सावंत ठरली. तर उत्तेनार्थ प्रथम सानिका गोखले, उत्तेजनार्थ द्वितीय विधिता केंकरे ठरली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.स्पर्धेच परिक्षण स्वप्नील गोरे, सतिश शेजवलकर यांनी केल. या स्पर्धेस ऑर्गनसाथ निलेश मेस्त्री, हार्मोनियम मंगेश मेस्त्री,तबला किशोर सावंत,निरज मिलिंद भोसले यांनी केली. स्पर्धेच सुत्रसंचालन संजय कात्रे यांनी केले.