
सावंतवाडी : गुरुवर्य निलेश रघुनाथ मेस्त्री यांचे वडील गुरुवर्य कै. रघुनाथ मेस्त्री उर्फ बाबी मेस्त्री यांचा ९ मार्च 2025 रोजी 15 वा स्मृतीदिन असून यानिमित्ताने सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ आणि विद्यालयातर्फे ''महिला दिनाचे'' औचित्य साधून खास विवाहित महिलांसाठी 'भावगीत स्पर्धेचे' आयोजन केले आहे.
संगीताची आवड असलेल्या व नवोदित संगीत शिक्षण घेत असलेल्या महिला स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. वयाची कोणतीही अट नसून चित्रपटातील भावगीत स्पर्धेसाठी चालणार आहे. गायनासाठी प्रत्येकी सहा मिनिटांचा वेळ दिला जाणार असून प्रथम नोंदणी केलेल्या 25 जणींना संधी मिळेल. सभासद संख्या वाढल्यास निवड चाचणी घेऊन सहभाग दिला जाईल. ही स्पर्धा ८ मार्च रोजी कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या सभागृहात सकाळी ९.३० वा. सुरू होईल. अधिक माहितीसाठी संपर्क -सौ आशा मुळीक 9420740854