सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा ४ फेब्रुवारीला

विजेत्यांना अडीच लाख रुपयांची रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 16, 2024 05:53 AM
views 1049  views

कणकवली : युवा संदेश प्रतिष्ठान व जिजाऊ संस्था महाराष्ट्र  यांच्यावतीने सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS - २०२४  रविवारी ४ फेब्रुवारी २०२४ ला ११ ते १ वाजता यावेळेत आयोजित करण्यात आली आहे .या परिक्षेचे हे ७ वे वर्ष असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हातून १०,४६७ विद्यार्थ्यानी नोंदणी केली असूनप्रत्येक इयत्तेतील पाहिल्या ५० अशा २५० गुणवंत विद्यार्थ्यांना अडीच लाख रुपयांची रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

तसेच ४ थी, ६ वी व ७ वी या प्रत्येक इयत्तेतील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) या संस्थेला व २ री, ३री, च्या टॉप फाईव विद्यार्थ्याना गोवा येथील सायन्स सेंटरला भेटीसाठी घेऊन जाण्यात  येणार आहे. या परीक्षेचे मुख्य परीक्षा केंद्रे - कणकवली कॉलेज, कणकवली असून इतर परीक्षा केंद्र पुढीलप्रमाणे आहेत - फोंडा हायस्कूल, जि. प. शाळा खारेपाटण नं. १, वामनराव महाडिक विद्यालय, तरेळे, शिरगाव हायस्कूल, शाळा जामसंडे न १,देवगड, शाळा कुणकेश्वर न १, देवगड, पडेल हायस्कूल, पडेल, रामगड हायस्कूल, आचरा हायस्कूल, टोपीवाला हायस्कूल,मालवण, वराडकर हायस्कूल कट्टा, कुडाळ हायस्कूल,कुडाळ, न्यू इंग्लिश स्कूल कसाल, वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव, RPD हायस्कूल ,सावंतवाडी, सैनिक स्कूल,आंबोली, जि प शाळा माडखोल नं. १, जि प शाळा मळेवाड नं. १, जि. प. शाळा सांगेली, जि. प. शाळा मळगाव, खेमराज हायस्कूल,बांदा, दोडामार्ग इंग्लिश स्कूल, दोडामार्ग, न्यू इंग्लिश स्कूल भेडशी, वेंगुर्ला हायस्कूल, अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी अशी आहेत.

त्याचप्रमाणे उत्तरपत्रिका OMR पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जाणार आहे. तसेच निकालादिवशी पालक, शिक्षक, विद्यार्थीयांना निकाल व सोडवलेली उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे. यावर्षी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर व ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहे.

युवा संदेश प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि अध्यक्षा संजना संदेश सावंत (माजी जि. प. अध्यक्ष ) यांनी सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा २२०४ साठी सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या असून अधिक माहितीसाठी STS परीक्षा प्रमुख सुशांत सुभाष मर्गज (९४२०२०६३२६) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.