विकृतीच्या नायनाटासाठी सिंधुदुर्गवायांनो एकत्र या ; विनायक राऊतांची हाक

कै. श्रीधर नाईक यांच्या स्मृतिदिनी समाजोपयोगी कार्यक्रम
Edited by: उमेश बुचडे
Published on: June 22, 2023 18:25 PM
views 79  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा हा विचारवंतांचा व संस्कृतीचे संवर्धन करणारा आहे. बॅ. नाथ पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू या विचारावंतांना सिंधुदुर्गवासीयांनी खासदार म्हणून नेतृत्व करण्याची संधी दिली. मात्र, अलीकडच्या काळात जिल्ह्यात राजकीय दहशतवाद व दादागिरी ही विकृती फोफावत चालली आहे. या विकृतीने विचारी व परोपकारी श्रीधर नाईक यांचा बळी घेतला. त्यामुळे या विकृतीचा नायनाट करण्यासाठी सिंधुदुर्गवायांनी एकत्र आले पाहिजे.असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी येथे केले. श्रीधर नाईक यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त नरडवे तिठा येथील उड्डाणपुलाखाली जागेत रक्तदान शिबीर व बचतगटांच्या सत्कार व आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन नाईक कुटुंबीय व श्रीधर प्रेमींनी गुरुवारी केले होते. यावेळी खासदार विनायक राऊत बोलत होते. 

     याप्रसंगी माजी खा. ब्रिगे.सुधीर सावंत,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख सतीश सावंत,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, अतुल रावराणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,काँग्रेस कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, संग्राम प्रभुगांवकर,  युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,राजू शेटये, सचिन सावंत, 

कन्हैया पारकर,मुरलीधर नाईक, संकेत नाईक, रुपेश नार्वेकर, अशोक करंबेळकर,डॉ पटेल,रामू विखाळे, हरी खोबरेकर,गणेश कुडाळकर,अनंत पिळणकर, भास्कर राणे,राजू राठोड,वैदेही गुडेकर,दिव्या साळगावकर, प्रतीक्षा साटम,राजू राणे, बाळू मेस्त्री,प्रसाद अंधारी,मंदार सावंत, विजय पारकर,बंडू ठाकूर,दादा कुडतरकर,अरुण भोगले,आबा दुखंडे,विजय कोदे, हर्षद गावडे, उत्तम लोके, रुपेश आमडोस्कर,योगेश मुंज निसार शेख,संजय पारकर, सचिन आचरेकर धीरज मेस्त्री, नितेश भोगले,सचिन खोचरे, तेजस राणे,मिलिंद आईर आदींसह श्रीधर नाईक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार राऊत म्हणाले,  श्रीधर नाईक यांच्या समाजसेवेचा वारसा त्यांचे पुत्र सुशांत नाईक, संकेत नाईक, पुतणे आमदार वैभव नाईक समर्थपणे पुढे नेत आहेत. नाईक कुटुंबीय सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून श्रीधर नाईक यांच्या स्मृती जपण्याचे काम करीत आहेत. सुशांत नाईक हे युवासेनेचे काम करीत असून भविष्यात त्यांना राजकीय क्षेत्रात 'अच्छे दिन' असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार वैभव नाईक म्हणाले, श्रीधर नाईक यांचे कार्य आजच्या तरुण पिढीला कळले पाहिजे. याकरिता त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त नाईक कुटुंबीय व श्रीधर नाईक प्रेमी समाजोपयोगी कार्यक्रमांचे गेली ३२ वर्षे आयोजन करीत आहेत. श्रीधर नाईक यांचे राजकीय, सामाजिक, क्रीडाक्षेत्रासह अन्य क्षेत्रातील कार्य मोठे आहे. आपल्याला त्यांचा त्रास होईल, यातून काही मंडळींनी त्यांची हत्या केली. श्रीधर नाईक यांच्या कार्याचा वसा आम्ही पुढे नेत राहिलो, त्यामुळे मी आमदार होऊ शकलो. राजकीय क्षेत्रातील सध्याचे गढूळ वातावरण पाहून तरुण-तरुणींनी राजकीय क्षेत्रापासून लांब राहू पाहत आहेत. ही वस्तूस्थिती असली तरी तरुणांनी राजकीय क्षेत्रात आले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला होता. या परिस्थितीत श्रीधर नाईक यांनी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद घेऊन तळागाळात काँग्रेसची विचारधारा पोहोचविण्याचे काम केले. सिंधुदुर्ग फोफावलेल्या अपप्रवृतीविरोधात श्रीधर नाईक यांनी संघर्ष केला. काही अपप्रवृतींच्या लोकांची त्यांची हत्या केली. जो कार्यकर्ता पक्षासाठी जीवाचे रान करून पक्षवाढीसाठी कार्य करतो. मात्र, त्याच्या खंबीरपणे पाठिशी पक्ष उभा राहत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त करतानाच श्रीधर नाईक यांच्याबाबतीत हेच घडले. जिल्ह्यात सध्या आसूरी शक्ती वाढत असून या शक्तीचा बीमोड करण्यासाठी श्रीधर नाईक प्रेमींनी एकत्र यावे, असे आवाहन सावंत यांनी केले.

संदेश पारकर म्हणाले, श्रीधर नाईक यांच्या स्मृती जपण्याचे काम नाईक कुटुंबीय व श्रीधर नाईक प्रेमींनी गेली ३२ वर्षे करीत आहेत. कणकवली जडणघडणीत श्रीधर नाईक यांचे मोठे योगदान असून त्यांच्या नावाने क्रीडा ॲकॅडमी सुरु करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

यावेळी इर्शाद शेख, अमित सामंत, अरुण भोगले यांनी श्रीधर नाईक यांच्या आठवणींना उजाळा दिला.

प्रास्ताविक सुशांत नाईक यांनी करताना श्रीधर नाईक यांचा स्मृतिदिन साजरा करण्याचा सामाजिक दृष्टिकोन उपस्थितांना सांगितला. तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन श्रीधर नाईक प्रेमी गेली ३२ वर्षे करून त्यांच्या स्मृती जपण्याचे काम करीत असल्याबद्दल सुशांत नाईक यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा हस्ते बचत गटांना स्मृतिचिन्ह व छत्र्या देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे श्रीधर नाईक यांचे त्यावेळेचे  स्वीयसहाय्यक अकुंश निमणकर यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी नरडवे तिठा येथील श्रीधर नाईक चौकातील श्रीधर नाईक यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सूत्रसंचालन विनायक मेस्त्री यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने श्रीधर नाईक प्रेमी उपस्थित होते.

सर्वांनी एकत्र येऊन दहशतवाद संपविला पाहिजे!

 श्रीधर नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून गतवर्षी कणकवलीत  श्रीधर नाईक उद्यान विकसित करून त्याचे उदघाटन करण्यात आले. श्रीधर नाईक यांच्या हत्येनंतर त्या प्रवृत्ती विरोधात मोठा संघर्ष झाला. त्या संघर्षाला २०१३ साली खासदर विनायक राऊत व त्यानंतर आमदार वैभव नाईक निवडून आल्याने  यश मिळाले.कणकवली मतदारसंघात दहशतवाद,दडपशाही,हुकूमशाही अजूनही जिवंत आहे. सर्वानी एकत्र येऊन दहशतवाद संपविला पाहिजे. त्यासाठी ब्रिगेडियर सावंत त्यावेळी आमच्याबरोबर होते तसे यावेळीही आमच्याबरोबर राहतील असा विश्वास सुशांत नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.