सिंधुदुर्गातील पहिले VVIP अत्याधुनिक शासकीय रेस्ट हाऊस कणकवलीत !

उद्या होणार उद्घाटन
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 07, 2024 13:09 PM
views 108  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3800 कोटीचा निधी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे उद्या केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली मधील अत्याधुनिक पद्धतीचे सर्व सोयी सुविधा युक्त VVIP कनकसिंधू शासकीय विश्रामगृह व शहरातील  गणपती साना ते जानवली ब्रिज सह विविध कामाची भूमी पूजन आणि उद्घाटने उद्या होणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे म्हणूनच या जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भूमिपुत्र म्हणून सर्वांना विचारात घेऊन काम करणारे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रथमच 3800 कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी उपलब्ध होण्यासाठी  केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आणि भाजप आमदार नितेश राणे यांचे देखील मोठे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतल्याचे दिसत आहे


उद्या जिल्ह्यातील 30 पेक्षा जास्त कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहेत प्रत्यक्षरीत्या कणकवली मधील कनक सिंधू या नावाने  VVIP अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधा युक्त शासकीय विश्रामगृह व कणकवली गणपती साना ते जानवली जाणाऱ्या ब्रिजचे देखील उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे त्यांच्या उपस्थितीत होणार आहे तसेच इतर उद्घाटने आणि कामांची लोकार्पण हे सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे ऑनलाईन पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहप्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर व भाजप आमदार नितेश राणे या सर्वांचे मोठे योगदान असल्याचे  कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्व गोड यांनी सांगितले.