
सावंतवाडी : देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालय व स्वावलंबी भारत अभियान कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये उद्यमिता प्रोत्साहन संमेलन व वीर शहीद बाबू गेनू यांची पुण्यतिथी निमित्त गवाणकर महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग मध्यवर्ती को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सिंधुदुर्गातील व्यवसायिक अभ्यासक्रमाला चालना देणारे देशभक्त शंकराव गव्हाणकर कॉलेजच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली आहे. तुम्हाला तुमच्याच भागात राहून व्यवसायिक अभ्यासक्रम निवडता येऊन त्यामध्ये पारंगत होता येणार आहे. यातून तुम्ही निश्चितपणे या सिंधुदुर्ग जिल्हा वासियांना आणि या संस्थेला तुमच्या कामातून परतफेड करा आपण अभ्यासक्रम निवडताना विचारपूर्वक निवडायला हवा स्वदेशीचा वापर वाढवायला शिका त्याचप्रमाणे येथील विद्यार्थ्यांना कसे उद्योजक्ताईकडे वळवता येईल त्यासाठीच विद्यार्थी दशेतच त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत बँक वेगवेगळ्या प्रकारे आपणास कर्ज देत आहे. या कर्जांचा उपयोग उद्योग वाढवण्यासाठी केला पाहिजे. सिंधुदुर्ग मध्ये सर्व काही आहे. फक्त परिश्रमाची जोड असणे आवश्यक आहे आणि यासाठी ही युवाशक्ती भारत देशाचे नाव आज उज्वल करू शकते. नवीन नवीन उद्योजक घडू शकतात असे यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी यांनी आपले विचार स्पष्ट केले. सावंतवाडी येथील देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेजमध्ये स्वावलंबी भारत अभियान कोकण प्रांत तसेच शहीद बाबू गेनू बलिदान दिवस व उद्यमीता प्रोत्साहन संमेलन आयोजित करण्यात आले होते.
स्वावलंबी भारत अभियान कोकण प्रांताचे जिल्ह्याचे कोऑर्डिनेटर अमित नाईक यावेळी उपस्थित होते. त्यांनी शहीद बाबू गेनू यांच्या स्वदेशी प्रेम व त्यांनी दिलेले बलिदान व त्यांचे विचार विद्यार्थ्यांना स्पष्ट केले. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री यशोधन गवस सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी प्राध्यापक शैलेश गावडे आनंद नाईक सौ अस्मिता गवस सौ मेधा मयेकर व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.