
सिंधुदुर्गनगरी : रविवार दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी गणपतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, गोपुरी आश्रम, वागदे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथे जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा सर्कल अंतर्गत महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना संलग्नित आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेच्या माध्यमातून येत्या १२ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान नांदेड येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर (१९ वर्षाखालील) निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघाची निवड करण्यात आली.
जिल्ह्यातील अनेक उभरते खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. दिवसभर चाललेल्या लढतींमध्ये खेळाडूंनी अचूक डावपेच, शांतचित्त विचारशक्ती व जिद्दीच्या जोरावर दमदार कामगिरी केली. प्रेक्षक व पालकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसादही लक्षणीय होता.
मुलांच्या गटातील विजेते :
प्रथम क्रमांक : सुश्रुत नानल
द्वितीय क्रमांक : वरद तवटे
तृतीय क्रमांक : विभव राऊळ
चतुर्थ क्रमांक : यश पवार
मुलींच्या गटातील विजेते :
प्रथम क्रमांक : मीनल सुलेभावी
द्वितीय क्रमांक : मुग्धा साहिल
तृतीय क्रमांक : भाग्यता साळकर
चतुर्थ क्रमांक : गार्गी सावंत
या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय निवड स्पर्धेसाठी निवड झाल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी श्री. सुयोग धामापूरकर (अध्यक्ष), श्री. सुशील निबरे (उपाध्यक्ष) आणि श्रीकृष्ण आडेलकर (सचिव) श्री नंदन वेंगुर्लेकर (सदस्य )यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नांमुळे ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. गोपूरी आश्रम कणकवली पदाधिकारी श्री नितिन तळेकर , विनायक सापळे , भालचंद्र कुलकर्णी, जयवंत म्हापसेकर , संतोष गांगनाईक, पंच मयुरेश मालवणकर, विरेंद्र नाचणे , गुणलेखक समिर राऊळ, प्रशिक्षक व पालक यांचेही सहकार्य मोलाचे ठरले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सर्वत्र त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.










