'सिंधुदुर्ग पर्यटन' विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम

Edited by:
Published on: December 21, 2023 19:26 PM
views 44  views

देवगड : श्री. स. ह. केळकर महाविद्यालय देवगड यांनी २१-२३ डिसेंबर रोजी 'सिंधुदुर्ग पर्यटन' या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. सिंधुदुर्ग पर्यटन, रोजगार निर्मिती, विपणन आणि पर्यटन, पक्षी निरीक्षण आणि खारफुटीमधील बोटींचे निरीक्षण, जलक्रीडा आणि सागरी पर्यटन, सागरी ऐतिहासिक किल्ले आणि त्याचे मार्गदर्शक हे या कार्यक्रमातील विषय आहेत. सागरी पक्षी तज्ञ आणि मॅन्ग्रोव्ह टूर ऑपरेटर लक्ष्मण तारी, डिजिटल मार्केटिंग तज्ञ नंदकिशोर हरम, कातळशिल्प तज्ञ  रणजित रमेश हिर्लेकर, विजयदुर्ग किल्ल्याचे मार्गदर्शक अवधुत पाटील आपापल्या क्षेत्रावर बोलणार आहेत. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पर्यटन तज्ञ समितीचे सदस्य आणि इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. शाम चौघुले संपूर्ण कार्यक्रमाला मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी ८ ते दुपारी २.३० पर्यंत चालणार आहे. ३ दिवसांच्या कार्यक्रमासाठी नोंदणी शुल्क ३००/- रुपये आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. अधिक माहितीसाठी प्रा अमोल तेली मो.7588449136 किंवा 9969029226 प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. शाम चौघुले यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन केलय.