
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी मुंबईला 100 एसटी बस गेल्याने प्रत्येक तालुक्यातून लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील तब्बल 300 पेक्षा जास्त फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
यामध्ये कणकवली तालुक्यातील 34 , सावंतवाडीतील 36 मालवण 58, देवगड 86, विजयदुर्ग 37, कुडाळ 42, वेंगुर्ला 73 या फेऱ्या एसटीच्या रद्द करण्यात आले आहेत. त्यामध्ये लातूर, पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सावंतवाडी या लांब पल्ल्याच्या तसेच जिल्हा अंतर्गत देवगड वेंगुर्ला मालवण व काही ग्रामीण भागातील बस फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.