
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी बुधवारचा दिवस विशेष ठरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मानाच्या ठरणाऱ्या गोष्टी या दिवशी घडून आल्या असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याने वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कारावर आपली मोहर उठवली आहे.
नितेश राणे यांचे पालकमंत्री पदा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वरदान ठरू लागले आहे. याचाच प्रत्यय बुधवारच्या दिवसभरात आला. हा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाचा ठरला आहे. याच दिवशी सकाळी राज्य बांबू धोरणातून सिंधुदुर्ग चे वगळलेले नाव सन्माने पुन्हा दाखल करण्यात आले. तर सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या खर्चामध्ये मुंबई सह संपूर्ण राज्यात पहिल्या रँक वर हा जिल्हा राहिला. त्यानंतर पुढील बातमी धडकली ती सिंधुदुर्ग जिल्ह्याची वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याची. त्यामुळे बुधवारचा दिवसा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विशेष दिवस ठरला आहे.
राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत राबविण्यात येत असलेल्या एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेमधील लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड निर्माण करण्यात येत आहे. त्यानुसार आपल्या जिल्हयातील ४९ गावातील लाभार्थ्यांचे १००% आयुष्मान कार्ड निर्माण झालेले असून एकूण कार्ड निर्माणातील जिल्हयाची कामगिरी सातत्यपुर्ण व प्रगतीशील आहे. सदर कामातील योगदान विचारात घेऊन आयुष्मान कार्ड निर्माण या वर्गवारीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे - जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्हयाची निवड करण्यात आली आहे.
हा पुरस्कार सोहळा दिनांक १७ ऑक्टोबर, २०२५ रोजी, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, पिंपरी चिंचवड येथे राकाळी ९.०० वाजता होणार आहे.










