
कुडाळ : पाण्याची वाढती मागणी आणि हवामान बदलाचे वेगाने ओढवणारे संकट यामुळे जगाला अभूतपूर्व जलसंकटाचा सामना करावा लागत आहे.
जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येला सध्या दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.कोकणही यात मागे नाही. वेळीच उपाययोजना केल्या तर आपण या संकटावर करू शकतो.यासाठी प्रथम प्रत्येक कोकणवासीय जलसाक्षर होणे गरजेचे आहे.
यासाठी सिंधुदुर्ग रोटरी परवारातील एकूण अकरा क्लबनी पुढाकार घेऊन जिल्ह्य़ातील विविध ठिकाणी पुणे येथील जलअभ्यासक इंजिनिअर सतिश खाडे यांची व्याख्याने आयोजित केली आहेत.याची माहीती देण्यासाठी सिंधुदुर्ग रोटरी परिवारातर्फे या चळवळीचे चेअरमन डाॅ.लिना लिमये, असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने, डाॅ.प्रशांत कोलते , डाॅ.विनया बाड हे उपस्थित होते.
पाणी आणि पर्यावरणाचे रक्षण हे रोटरी इंटरनॅशनल च्या उद्दिष्टांपैकी एक आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीयन अरूण भंडारे यांनी यावर्षाकरता चेक वाॅटर डॅम हे उद्दीष्ट दिलेले आहे.
प्रमुख वक्ते सतिश खाडे यांनी गेल्या बारा वर्षांत सहाशेहून जास्त व्याख्याने घेतली आहेत.
समाज जलज्ञानी व्हावा यासाठी ते कार्यरत आहेत.
दोन तासांच्या या कार्यशाळेत पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, पाणीबचत, सांडपाणी पुनर्वापर,रेन वाॅटर हार्वेस्टिंग या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.शास्त्रशुद्ध पध्दतीने भूजल संवर्धन कसे करावे,पाणी शुद्धीकरणाच्या नैसर्गिक पद्धती, वाॅटर बजेटींग, पाण्याची गुणवत्ता कशी जपावी, पाण्याचे अंदाजपत्रक कसे मांडावे , पाण्याचे प्रदूषण कसे टाळावे, कांदळवन संवर्धन, सांडपाण्याचे नियोजन या विषयांवर या कार्यशाळेत माहीती मिळणार आहे.
जलस्रोतांचे रक्षण आणि पाण्याचा काटेकोर वापर ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी या व्याख्यानातून अधोरेखित होईल असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त होत आहे.
दिनांक 25 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर यादरम्यान या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 25 नोव्हेंबर रोजी भोसले नाॅलेजसिटी काॅलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड फार्मसी सावंतवाडी स.10 ते 12,
बॅरिस्टर खर्डेकर काॅलेज वेंगुर्ला दुपारी 2 ते 4, 26 नोव्हेंबर- संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ- सकाळी 9 ते 11, छत्रपती शिवाजी अॅग्रीकल्चर काॅलेज ओरोस -सकाळी 11.30 ते 1.30, कणकवली-
27 नोव्हेंबर- एस के पाटील काॅलेज मालवण, सकाळी 10 ते 12
28 नोव्हेंबर देवगड- शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय सभागृह खारेपाटण सकाळी 9 ते 11
वैभववाडी - एएसपीम काॅलेज ऑफ फार्मसी सांगुळवाडी, 2 to 4 PM
जिल्ह्य़ातील सर्व रोटरीयन्स, रोटरॅक्टर्स, इंटरॅक्टर्,ससामाजिक संस्था प्रतिनिधी , सामाजिक कार्यकर्ते , शाळा -काॅलेजचे विद्यार्थी यांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यशाळेस उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी सिंधुदुर्ग परिवाराकडून करण्यात आले आहे.










