निलेश राणेंका आमदार कर रे महाराजा, सिंधुदुर्ग राजा चरणी भाजप पदाधिकाऱ्यांचे गाऱ्हाणे...!

प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी घेतलं सिंधुदुर्ग राजाचे दर्शन
Edited by:
Published on: September 26, 2023 14:06 PM
views 180  views

कुडाळ : भाजप प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे आज कुडाळ भाजप कार्यालय येथे  सिंधुदुर्गाच्या राजाचं दर्शन घेतलं.यावेळी त्यांच्या समवेत अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी निलेश राणे कुडाळ मालवण मतदार संघांचे विधानसभेचे आमदार म्हणून निवडून येऊ देत असं गाऱ्हाण भाजप पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर घालण्यात आले.

यावेळी महिला प्रदेश कार्यकारणी सदस्य संध्या तेर्से,  जिल्हा भाजप सरचिटणीस रणजित देसाई, चिटणीस विनायक राणे, जिल्हा कार्यकारणी सदस्य  पप्प्या तवटे, कुडाळ भाजपा तालुका मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर ओरोस मंडळ तालुका अध्यक्ष दादा साईल, माजी सभापती मोहन सावंत, कुडाळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, नगरसेवक अनिल परब, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, भाजप शक्ती केंद्रप्रमुख  राकेश नेमळेकर, नागेश नेमळेकर,  आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.