सिंधुदुर्ग प्रेस क्लबचे पत्रकार पुरस्कार जाहीर

Edited by: विनायक गांवस
Published on: January 08, 2025 13:28 PM
views 232  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चे 2024 -25 चे पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले असून प्रेस क्लब भुषण पुरस्कार पत्रकार रूपेश हिराप यांना तर प्रेस क्लबचा डिजिटल मिडिया पुरस्कार आनंद धोंड, प्रेस क्लब युवा पत्रकार पुरस्कार दोडामार्ग येथील प्रतिक राणे तर प्रेस क्लब कर्मचारी संघटना पुरस्कार गुरूनाथ कदम यांना जाहीर करण्यात आला आहे.

6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी सर्वजण दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण करतात त्या दिवशी प्रेस क्लबच्यावतीने उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, माजी माहिती अधिकारी सतिश पाटणकर तसेच नगरपरिषद आरोग्य अधिकारी धनंजय देसाई, अध्यक्ष सिताराम गावडे व हेमंत खानोलकर यांच्या छाननी समितीकडून या पत्रकार पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यात पत्रकार रूपेश हिराप हे गेली अनेक वर्ष पत्रकारितेत असून वेगवेगळ्या वृत्तपत्रातून आपली पत्रकारिता करत स्वताची वेगळी छाप निर्माण केली असून त्यांना प्रेस क्लब कडून प्रेस क्लब भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तर डिजिटल मिडीयात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे आनंद धोंड यांचा प्रेस क्लब डिजिटल मिडीया पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.तसेच प्रतिक राणे हे युवा पत्रकार असून दोडामार्ग तालुक्यात ते पत्रकारिता करतात, युवा पत्रकारांना आगामी काळात प्रोत्साहन मिळावे म्हणून खास गौरविण्यात आले आहे.तर पत्रकार याच्या बरोबरीने काम करत असतात त्याचा सन्मान म्हणून प्रेस क्लब कर्मचारी पुरस्कार गुरूनाथ कदम यांना जाहीर करण्यात आला आहे.या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ रोख रक्कम व प्रशस्तीपत्र असे असणार आहे.

 पुरस्काराची घोषणा छाननी समितीकडून जाहीर झाल्यानंतर या पुरस्कार प्राप्त सर्वाचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेस क्लब चे विद्यमान अध्यक्ष अनंत जाधव, सदस्य जय भोसले सचिव राकेश परब खजिनदार संदेश पाटील संजय भाईप रूपेश हिराप प्रा.रूपेश पाटील आनंद धोंड शैलेश मयेकर सहदेव राऊळ साबाजी परब प्रतिक राणे मदन मुरकर नाना धोंड निलेश राऊळ आदि उपस्थित होती. दरम्यान जाहीर पुरस्काराचे वितरण दिमाखदार सोहळा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.