सिंधुदुर्ग पोलीस दलाचे ५ कि.मी. मॅरेथॉनचं आयोजन !

पोलीस अधीक्षकांची उपस्थिती
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 27, 2023 11:05 AM
views 84  views

सिंधुदुर्ग : सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकॅडमीच्या ७५ व्या वर्धापन दिना निमित्त सिंधुदुर्ग पोलीस दलाचे ५ कि.मी. मॅरेथॉन आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्यासह पोलिस दलातील अधिकारी कर्मचारी या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले आहेत. तर जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी ही या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला आहे. 

 ही मॅरेथॉन सिंधुदुर्ग पोलीस परेड मैदान ते गरुड सर्कल पासून पुन्हा परत पोलीस परेड मैदान येथे दाखल होणार आहे या मॅरेथॉनमध्ये पोलीस अधिकारी अंमलदार यांचे कुटुंबीय सहभागी झाले आहेत. तर खाजगी संस्थेत पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. मॅसरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकॅडमीच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त  ही मॅरेथॉन संपूर्ण भारतात होत आहे.