'सिंधुदुर्ग कोकण भुषण पुरस्काराने' बंड्या धारगळकर सन्मानित !

Edited by: विनायक गावस
Published on: December 13, 2023 19:36 PM
views 512  views

सावंतवाडी : सावंतवाडीतील प्रसिद्ध तबलावादक बंड्या धारगळकर यांना 'सिंधुदुर्ग कोकण भुषण पुरस्कार' ह्युमन राईटस प्रेस पब्लिकेशन व सिंधुसेवा आश्रम महाराष्ट्र आयोजित माझा सिंधुदुर्ग सन्मान सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेते विश्वजीत फडते, विजय मानवतकर व राजश्री काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

बंड्या धारगळकर गेली ४० वर्ष संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्र व गोव्यातील प्रसिद्ध गायक, गायिका, किर्तनकार यांना तबला साथ त्यांनी केली आहे. अनेक विद्यार्थी त्यांनी तयार केले. उत्कृष्ट तबला साथीदार म्हणून ते ओळखले जातात. आकाशवाणी, दुरदर्शन, सीडीसाठी अनेक गायकांना तबला साथ केली आहे. महाराष्ट्र व गोव्यातील अनेक संस्थानी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.