सिंधुदुर्ग म्हणजे नररत्नाची खाण : पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण

सिंधुदुर्ग प्रेस क्लबकडून पत्रकार दिन
Edited by:
Published on: January 06, 2025 19:59 PM
views 40  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा हा नररत्नाची खाण आहे.येथे शिकण्यासारखे भरपूर आहे.त्याचा भविष्यातील पिढीने योग्य तो वापर करून घ्यावा असे आवाहन सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्यावतीने आयोजित दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी नगरपरिषद आरोग्य अधिकारी धनंजय देसाई माजी माहिती अधिकारी सतिश पाटणकर प्रेस क्लब चे संस्थापक अध्यक्ष सिताराम गावडे, हेमंत खानोलकर,विद्यमान अध्यक्ष अनंत जाधव, सदस्य जय भोसले, सचिव राकेश परब, खजिनदार संदेश पाटील, संजय भाईप, रूपेश हिराप, प्रा.रूपेश पाटील, आनंद धोंड, शैलेश मयेकर, सहदेव राऊळ, साबाजी परब, प्रतिक राणे, मदन मुरकर, नाना धोंड, निलेश राऊळ आदि उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष अनंत जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी पुष्पहार घातला तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मी मागील तीन वर्षे देवगड येथे असतना पोभुर्ले या बाळशास्त्रींच्या जन्मगावी जाण्याचा योग आला होता. आज येथे मला त्याचाच भास होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ही नररत्नाची खाण आहे.येथे हुशार लोक जन्माला आले त्यांनी आपले कर्तृत्व जनतेला दाखवून दिले. तसेच कार्य भविष्यात येणाऱ्या पिढीने करावे असे आवाहन केले.

पाटणकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारितेचा इतिहास मांडला तसेच दर्पणकार असो किंवा बाबुराव पराडकर यांनी एक सिंधुदुर्ग जिल्हयाला नाव देऊन गेले. येथील पत्रकारिता ही तशीच झाली पाहिजे असे आवाहन केले. आरोग्य अधिकारी धनंजय देसाई यांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन करत सर्वाना शुभेच्छा दिल्य. सिताराम गावडे यांनी आजचे युवा पत्रकार भविष्याती ल समाज व्यवस्थेचे घटक असतील त्यांनी ही पत्रकारिता करतना कुठल्याही प्रबोलभनाना बळी पडू नये असे आवाहन केले. यावेळी रूपेश पाटील यांनीही आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश परब तर आभार रूपेश हिराप यांनी यावेळी मांडले.