कणकवलीत उद्या 'निर्भय बनो' सभा..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 27, 2024 13:22 PM
views 159  views

कणकवली : रविवार दिनांक 28 जानेवारी रोजी कणकवलीत निर्भय बनो अभियानाची जंगी सभा होत आहे. या सभेमध्ये 'निर्भय बनो 'अभियानाचे संस्थापक ज्येष्ठ विचारवंत ,डॉ.विश्वंभर चौधरी आणि एडवोकेट असीम सरोदे मार्गदर्शन करणार आहेत

रविवार दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता कणकवली प्रांत कार्यालयासमोर मुंबई गोवा महामार्ग लगत ही सभा होणार असून या सभेस सिंधुदुर्ग वासियांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन "निर्भय बनो ''अभियानाच्या वतीने करण्यात आले आहे.

सध्या देशात लोकशाही संपविण्याचे, विरोधी पक्ष संपविण्याचे कारस्थान सुरू आहे महागाई बेरोजगारी, भ्रष्टाचार ,महिलांवरील अत्याचार ,अल्पसंख्यांक समुदायांच्या अधिकाराचा संकोच ,शेतकऱ्यांच्या आत्महत्या ,दलितांवरील अत्याचार इत्यादी जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून भावनिक मुद्द्यांचे राजकारण केले जात आहे.

त्यांना गुंतवून ठेवण्याचे षडयंत्र रचले जात आहे देशातील काही ठराविक भांडवलदारांचे आणि गुंतवणूकदारांचे तेवढे हित साधले जात आहे. जगातील मोठी लोकशाही म्हणून ज्या भारतीय लोकशाहीचा गौरव होत होता त्या लोकशाहीचा प्रवास आता हुकूमशाहीच्या दृष्टीने सुरू आहे .अशा कठीण परिस्थितीत समाजातील बुद्धिजीवी ,विचारवंत ,सामाजिक जाणीव असणाऱ्या व्यक्ती, संस्था ,संघटना ,पक्ष यांनी शांत राहून चालणार नाही. निर्भयपणे यावर बोलले पाहिजे .लाखो शहिदांच्या बलिदातून मिळालेले स्वातंत्र्य धोक्यात आलेले असताना आपण शांत राहिलो तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत …यासाठी रविवार दिनांक 28 जानेवारी रोजी कणकवली येथे होणाऱ्या या निर्भय बनो सभेस जनतेने प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निर्भय. बनो चळवळीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.